Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
Motivational Quotes in Marathi
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.