मराठी प्रेम कविता | Marathi Love Poems | Marathi Love Status
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.
तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.
एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.
Marathi love status
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.
मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.
love shayari Marathi
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.